7/27/2008

बूँदसे गई

सभा समारंभाचा होता
बाद्शहाला खूप षौक
वाढदिवसाला आपल्या त्याने
बोलावले खूप लोक १

हार तुर्‍यांनी होती सजली
एकूण एक दालने
नाण्यांच्या मैफिली रंगती
अन पक्वांनांची जेवणे ! २

निमंत्रित लोक करीती
सत्कार बादशहाचा आदराने
राजाही भेटीदाखल देई
त्यांना मौलीक नजराणे ३

समारंभाच्या गडबडीत
प्रसंग गमतीचा घडला
राजाच्या हातून किमती
अत्तराचा थेंब सांडला ४

थेंब तो टिपण्यासाठी
बादशहाने केली शर्थ
जाई जिरुन बिछायतीत तो
प्रयत्न त्याचे गेले व्यर्थ ! ५

आटापिटा टिपण्याचा थेंब
बिरबलाने होता पाहिला
येता ध्यानात बादशहाच्या
मनोमनी तो ओशाळला ६

एवढा मोठा सम्राट तो !
कशाचीही ददात नाही
नाही, अत्तर थेंबाच्या
मोहातून सुटला काही ! ७

लाज आपली पांघरण्या
राजा घेई लोक बोलवून
लुटे किमती अत्तर तो
मोठ-मोठ्या हौदांतून ! ८

अत्तराची उधळण पाहता
बिरबल म्हणे राजाला
बात एक कहूँ जो खाविंद
माफ करना गलतीं
बूँदसे गई, सो हौदसे नही आती ! ९

२८.९.९४

No comments: