7/26/2008

विद्वानांची परीक्षा

विद्वान अन पंडितांची
बादशहा नेहमी करी कदर
यथोचित सन्मानाने
व्यक्त करीतसे आदर

एके दिनी बादशहाने
भरल्या गच्च दरबारी
घेण्या परीक्षा विद्वानांची
प्रश्नांच्या झाडल्या फैरी

दात कुणाचा मोठा,
अन मोठे कशाचे फूल?
कोण राजा मोठा, अन्
मोठे कुणाचे मूल?

एकेका विद्वानाने मग
दिली उत्तरे अशी तशी
पटेना राजाला ती अन्
खट्टू होई तो मनाशी

एवढा मोठ सम्राट मी
पण का नसे इथे कुणी ?
देई उत्तरे जो शंकांची
असा खरा माणूस गुणी !

तेव्हढयात मग बिरबल
झटकन पुढे झाला
विचारलेल्या प्रश्नांची
उत्तरे देता झाला

फूल कापसाचे मोठे
देई सर्वांना ते वस्त्र !
शेतीसाठी मदत करी जो
गाईचा तो मोठा पुत्र !

नांगरणार्या नांगराचा
दात हा नसे लहान,
मेघराजा तो मोठा
सृष्टीला जो देई जीवन !

२८..९४

1 comment:

Anonymous said...

Nice