7/25/2008

बादशहाचा पोपट

एकदा बादशहाने हौशीने
पाळला एक पोपट सुन्दर
दिमतीला त्याच्या त्याने
ठेवले भरपूर नोकर चाकर

बादशहा मग सान्गे त्यांना
खबरदार अन याद राखा
सुळी देईन एकेकाला
हलगर्जीने जर पोपट मरता

खूप बडदास्त ठेवूनही
कधी पोपटाने प्राण सोडले
लक्षात येता, नोकरांच्या
तोंडचे तर पाणीच पळाले

काय करावे, कसे करावे
काहीच कुणा सुचेना
बादशहाला सांगण्याचे
धाडस कुणा होईना

विचारात मग नोकर सारे
प्रसंग होता मोठा बाका
वाटले सर्वांना मग आता
बिरबलच करू शकेल सुटका



राजाला मग बिरबल सांगे
राघू आपला फकीर बनला
डोळे मिटून जप करीत
पिंजर्यात तो आहे बसला

क्रोधीत राजा म्हणे मग
पाहून पिंजर्यात पोपटाला
मेला आहे तो पोपट
कसे कळेना तुम्हाला !

साधी गोष्ट नाही कळली
बिरबल म्हणे बरंच झालं
प्राणावरचं संकट जणू
दैवानेच दूर सारलं

सारा प्रकार ध्यानात येता
बादशहाचा राग शांत झाला
शिक्षा करता कुणाही
बिरबलाला बक्षिसी देता झाला

संकट टळता जीवावरचे
नोकरांच्या डोळ्यात पाणी आले
कॄतज्ञतेने सर्वांनी मग
बिरबलाचे पाय धरले १०

No comments: