7/25/2008

मस्करी

अकबर आणि बिरबल

एके दिनी बादशहाला
वाटले खावे खूप आंबे
महालात मग खाई तो
चवीने ते राणी संगे १

मस्करीची मग बादशहाला
येई जराशी लहर
टाकी मग सालपटे तो
राणीच्या पायाजवळ २

तेथे मग येता बिरबल
राजा बोले थट्टेने
माणसे किती हावरी, बघ
आंबे खाती पट्टीने ३

राणी किती खादाड म्हणून
काय तुला सांगु
सालपटांचाच ढीग बघ
लागलाय किती जमू ! ४

बिरबलही मग राजाची
गंमत करी जराशी
म्हणे, राणीपेक्षा आपणच
आहात खूप आधाशी ५


राणीने तरी रस चाखून
साली, कोयी दिल्या फेकून
आपण तर त्यासकट
सर्व आम्बे गेला खाऊन ६

बिरबलाच्या उत्तराने
हास्याची मग खसखस पिकली
म्हणती राजाराणी मग
आमचा बिरबल आहे अकली ७

(27.08.94)

No comments: