7/26/2008

प्राणाहुनी प्रिय

एकदा बादशहा अन बिरबल
मारीत होते गपा
राजा म्हणे बिरबलाला
प्रश्न विचारु का एक सोपा?

पृथ्वीतलावरती या
आहे तरी काय असे
सर्व प्राणीजनांना
सर्वांहुनी प्रिय असे

सांगे बिरबल विचाराने
काही जरी कुणा प्रिय असे
स्व-प्राणाहुनी हवेहवेसे
पृथ्वीतलावर काही नसे !

म्हणे बिरबल राजाला
असेल जर आपली संमती
माझ्या म्हणण्याची मग मी
दाखवून देईन प्रचीती

बिरबलाने मग आणली
वानरी एक पकडवून
तिला तिच्या पिलासकट
दिले एका हौदात सोडून

रिकाम्या त्या हौदात मग
पाणी खूप सोडण्यात आले
जीव वाचवण्यां पिलाचा
वानरीने त्याला उचलून घेतले

खांद्यापर्यंत चढता पाणी
वानरीला वाटली धास्ती
लाडक्या पिलाला तिने
ठेवले आपल्या डोईवरती

नाकातोंडात शिरता पाणी
वानरीचा जीव गुदमरला
चढून अंगावर पिलाच्या
जीव तिने वाचवला !

अकबर म्हणे बिरबलाला
म्हणणे तुझेच आहे खरे
सर्वांहूनही आपलाच
जीव हा प्रिय असे !

24.9.94

No comments: