5/09/2009

छलांग !

गेल्या वर्षी सवाईमधे अनुज आणि स्मृती मिश्रा या बहिणभावांनी कथ्थकचा अविस्मरणीय अविष्कार सादर केला. मोठा भाऊ आणि वडील तसेच गुरु श्री. मिश्रा यांनी त्यांना साथ केली. या प्रसंगी अनुजने एक मागुन एक असे कथ्थकचे बरेच पैलु उलगडले. त्यातच गुरुंच्या आज्ञानुसार त्याने एका दमात स्वत: भोवती १०३ गिरक्या घेतल्या ! हा त्या कार्यक्रमाचा परमोच्च क्षण होता. त्याच्या गिरक्या संपता न संपतात तोच अख्या सवाई श्रोतृवर्गाने उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्याला कौतुकमिश्रीत दाद दिली. सवाईत यापूर्वी क्वचितच कुणाला अशी दाद मिळाली असेल, नाही का? कार्यक्रम असा रंगात असतांना मी एका कोपर्‍यात काहीतरी नविन पोझ मिळेल या आशेने एखाद्या शिकार्‍यासारखा टपुन बसलो होतो. डोळ्याला कॅमेरा लावून मी किती वेळ बसलो होतो कुणास ठाऊक. तश्यातच अनुजने गिरकी घेत ऎटदारपणे अशी काही उडी मारली, की विचारुच नका. अशाच क्षणाची तर मी एव्हढावेळ वाट पहात होतो. जमलेल्या बहुतेक उत्साही फोटोग्राफरकडुन हा क्षण निसट्ला होता, हे मला कळल्यावर कसला अमुल्य ठेवा मला गवसलाच्या आनंद झाला म्हणून सांगु !

2 comments:

veerendra said...

va .. mastach ..
tumachya skills na salam !

Sonal said...

you are lucky to capture this instance. And I can very well tell you it feels so bad when you miss a "never again" moment.. Picture is awsome and the moment which is described is undoubtedly worth a praise.