7/26/2008

विद्वानांची परीक्षा

विद्वान अन पंडितांची
बादशहा नेहमी करी कदर
यथोचित सन्मानाने
व्यक्त करीतसे आदर १

एके दिनी बादशहाने
भरल्या गच्च दरबारी
घेण्या परीक्षा विद्वानांची
प्रश्नांच्या झाडल्या फैरी २

दात कुणाचा मोठा,
अन मोठे कशाचे फूल?
कोण राजा मोठा, अन्
मोठे कुणाचे मूल? ३

एकेका विद्वानाने मग
दिली उत्तरे अशी तशी
पटेना राजाला ती अन्
खट्टू होई तो मनाशी ४

एवढा मोठ सम्राट मी
पण का नसे इथे कुणी ?
देई उत्तरे जो शंकांची
असा खरा माणूस गुणी ! ५

तेव्हढयात मग बिरबल
झटकन पुढे झाला
विचारलेल्या प्रश्नांची
उत्तरे देता झाला ६

फूल कापसाचे मोठे
देई सर्वांना ते वस्त्र !
शेतीसाठी मदत करी जो
गाईचा तो मोठा पुत्र ! ७

नांगरणार्‍या नांगराचा
दात हा नसे लहान,
मेघराजा तो मोठा
सृष्टीला जो देई जीवन ! ८

२८.८.९४

1 comment:

Anonymous said...

Nice